मंगळवेढा ब्रेकिंग! अनैतिक संबंधात आडकाठी; पत्नीकडून प्रियकराच्या मदतीने 'पती'चा केला खून - Mangalwedha Times

Breaking

शुक्रवार, २३ एप्रिल, २०२१

मंगळवेढा ब्रेकिंग! अनैतिक संबंधात आडकाठी; पत्नीकडून प्रियकराच्या मदतीने 'पती'चा केला खून



टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा येथील सोलापूर रस्त्यावरील एका शेतात सुतळी रस्सीने भीमा सदा ढाणे (वय ५२ , रा. नागणेवाडी) याचा गळफास लावून खून केल्याच्या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे.


अनैतिक संबंधास अडथळा ठरत असल्याने त्याच्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने खून केल्याचे तपासात आढळले आहे. या प्रकरणी त्या दोघांविरुद्ध येथील पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.


तसेच पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. मनीषा ढाणे (रा.नागणेवाडी), आनंदा तुकाराम व्हनमुखे (रा.मारोळी, हल्ली रा.शांती नगर, मंगळवेढा) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.


मोलमजुरी करणारे भीमा ढाणे हे दि.१९ एप्रिल रोजी सायंकाळी घरगुती कामासाठी घराबाहेर पडले होते. परंतु ते घरी न परतल्याने कुटुंबीयांनी पोलिसांत हरवल्याची तक्रार दिली होती.


दुसऱ्या दिवशी दुपारी एकच्या सुमारास हरी बाबू घाटूळ यांच्या शेतात भीमा यांचा मृतदेह आढळला होता. पोलिस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे, नाईक तुकाराम कोळी, सोमनाथ माने यांनी तपास केला. आणि खुनाची उखळ काही तासांत लावण्यात यश आले.या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल बामणे हे करीत आहेत.


दारू पाजून नेले घटनास्थळी

संशयित मनीषा व आनंदा या हे दोघे हरी घाटूळ यांच्या शेतातील झाडाखाली गेले होते. ते निर्जन ठिकाण असल्याने त्यांनी ती जागा खुनासाठी निवडली. तसेच तेथे खुनाचा कट रचला. त्यानुसार घटनेदिवशी आनंदा याने भीमा यांना दारू पाजली.


त्यांना तेथे नेऊन गळफास लावून खून केला. तसेच झाडाला बांधले. आनंदा याने खून केल्यानंतर फोनवरून मनीषा हिला कळविल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.








ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9970766262 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा