मंगळवेढ्यात जुगार अड्यावर पोलीसांचा छापा. ४ जणांविरूध्द गुन्हे दाखल! - Mangalwedha Times

Breaking

गुरुवार, १० जानेवारी, २०१९

मंगळवेढ्यात जुगार अड्यावर पोलीसांचा छापा. ४ जणांविरूध्द गुन्हे दाखल!



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

मंगळवेढा शहरात मन्ना नावाचा जुगार खेळणार्‍या जुगार अड्यावर पोलीसांनी छापा टाकून तिघासह ४ हजार ४२० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला असून ४ जणांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, मंगळवेढा शहरातील कृष्ण तलावा पाठीमागील बाजूस पटवर्धन यांच्या शेतामध्ये नारळाच्या झाडाखाली आडोशाला मन्ना नावाचा जुगार चालत असल्याची गोपनीय माहिती पोलीस कॉन्स्टेबल अलमगीर लतीब यांना मिळाली. दि.१० जानेवारी रोजी दुपारी ३ च्या सुमारास सदर ठिकाणी पोलीसांच्या मदतीने छापा टाकला असता यशवंत जगन्नाथ ठेंगील (वय.४६ रा.मूढवी ता.मंगळवेढा), नसीर वल्लीसाहेब मुलाणी (वय.५६ रा.नर्मदा पार्क,मंगळवेढा), दत्तात्रय शिवाजी पवार (वय.३२ रा.मित्र नगर,मंगळवेढा), व अशोक दिगंबर खंदारे (वय.४५ रा.साठेनगर,मंगळवेढा) हे गोलाकार बसून मन्ना नावाचा जुगार खेळत असल्याचे पोलीसांच्या निदर्शनास आले.

यावेळी पोलीसांनी रोख रक्कमसह ४ हजार ४२० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीसांना पाहताच यातील अशोक खंदारे हा पळून गेला असून उर्वरीत सर्व लोकांना पोलीसांनी कारवाईसाठी ताब्यात घेवून कारागृहाची हवा दाखविली आहे. याची फिर्याद पो.कॉ.अलमगीर लतीब यांनी दिली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.









कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा