मंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथील प्रतीक शिवशरण या अपह्त मुलाच्या हत्येप्रकरणी मंगळवेढा पोलिसांनी तिसऱ्या आरोपी नानासो पिराजी डोके (वय.६८ रा.माचणूर) या इसमास माचनुर येथून अटक केली आहे.
प्रतिक शिवशरण (वय.९, रा.माचणूर,ता. मंगळवेढा) हा मुलगा त्याच्या घरापासून दि. 26 ऑक्टोबर 2018 रोजी अचानकपणे गायब झाला होता. नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला परंतु शोध लागत नव्हता परंतु काही दिवसाने त्याचा मृतदेह छिन्न विच्छीन्न अवस्थेत मिळून आला. याबाबत मंगळवेढा पोलीस ठाण्यात प्रथम अपहरण नंतर खूनाचा गुन्हा दाखल झाला होता. त्यावरून त्याचा नरबळी दिला गेला असल्याबाबतचे वातावरण परिसरात निर्माण झाले होते.
दरम्यान या गुन्ह्यातील संशयीत म्हणून एका १७ वर्षीय मुलाला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. चौकशीअंती त्यानेच खून केल्याचा प्राथमिक तपासात आढळून आले त्याने हा खून का केला आणखी काही त्याचे साथीदार यामध्ये आहेत का याचा तपास सुरू होता त्यानुसार काही दिवसापूर्वी पोलिसांच्या विशेष पथकाने माचनूर परिसरातील काही घरांची तपासणी केली असल्याची चर्चा गावात सुरू होती. हत्येतील अल्पवयीन आरोपीस बाल सुधारगृहात ठेवण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी संशयित आरोपी म्हणून भारत शिवशरण यास अटक केली होती.
तर आज शुक्रवारी दि.११ जानेवारी रोजी माचणूर येथील नानासो पिराजी डोके यांना उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप जगदाळे यांनी अटक केली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा