मंगळवेढ्यात शाळेला जाणार्‍या अल्पवयीन मुलीला पळविले,एका विरूध्द गुन्हा दाखल - Mangalwedha Times

Breaking

सोमवार, २८ जानेवारी, २०१९

मंगळवेढ्यात शाळेला जाणार्‍या अल्पवयीन मुलीला पळविले,एका विरूध्द गुन्हा दाखल



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा :-

शाळेला जात असताना एका 13 वर्षीय मुलीला अज्ञात कारणावरून फुस लावून पळवून नेल्याची घटना हुन्नूर ता.मंगळवेढा येथे घडली असून याप्रकरणी म्हाळाप्पा नागनाथ हेगडे वय-20 वर्षे याच्या विरूध्द  गुन्हा दाखल झाला आहे.

या घटनेची हकीकत अशी की, हुन्नूर येथील अल्पवयीन मुलगी दिनांक 25 रोजी माध्यमिक आश्रम शाळेत जात असताना सकाळी 9.30 च्या दरम्यान आरोपी म्हाळाप्पा हेगडे याने अज्ञात कारणावरून तीला फुस लावून एम.एच.13 2322 या मोटरसायकलवरून पळवून नेल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी फिर्याद दाखल केल्यानंतर म्हाळाप्पा हेगडे याच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश विधाते करीत आहेत.










कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा