पत्रकार सुरक्षा समितीच्या जिल्हाध्यक्षपदी बाबासाहेब सासणे यांची निवड - Mangalwedha Times

Breaking

रविवार, २७ जानेवारी, २०१९

पत्रकार सुरक्षा समितीच्या जिल्हाध्यक्षपदी बाबासाहेब सासणे यांची निवड

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा :-

पत्रकार सुरक्षा समितीच्या पंढरपूर विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी बाबासाहेब सासणे यांची निवड करण्यात आली आहे. पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांच्या हस्ते निवडीचे पत्र देवून फेटा बांधून बाबासाहेब सासणे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

मंगळवेढा येथे पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार व ज्येष्ठ पत्रकार दिगंबर भगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत सासणे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली.यावेळी सासणे यांच्या जिल्हाध्यक्ष पदासाठीच्या निवडीची सुचना तानाजी चौगुले यांनी मांडली तर त्यास संभाजी मस्के यांनी अनुमोदन दिले.

यावेळी मंगळवेढा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर भगरे, पत्रकार सुरक्षा समितीचे तालुकाध्यक्ष मोहन माळी, साप्ताहिक संघटनेचे तालुकाध्यक्ष समाधान फुगारे, प्रमोद बिनवडे, तानाजी चौगुले, दत्ता कांबळे, संभाजी मस्के, बाळासाहेब जामदार, दादासाहेब लवटे, पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर शहर संपर्कप्रमुख बिराजदार, बाबा काशीद, लखन कोंडूभैरी, हे उपस्थित होते.












कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा