मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा :-
मंगळवेढा येथील दामाजी महाविद्यालयासमोर सोलापूर दिशेने येणाऱ्या ट्रकने समोरून येणाऱ्या दुचाकीस्वारास जोराची धडक दिल्याने राहुल शिवाजी कसगावडे तरुण जागीच ठार झाला आहे.तर अमोल लक्ष्मण शिंदे व अशोक सीताराम सावंजी हे दोघे जखमी झाले आहेत.
ट्रकचालकाने बेजबाबदार पणाने ताब्यातील वाहन चालवून दुचाकीस्वारास समोरून जोराची धडक दिली ट्रकमध्ये दुचाकी अडकून ४०० मीटर अंतरावर गाडी ओढत नेली असून पायी चालत येणाऱ्या शिंदे याला देखील ट्रकने जोराची धडक दिली आहे.ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा