मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा :-
मंगळवेढा शहरात मन्ना नावाचा जुगार खेळणार्या जुगार अड्यावर पोलीसांनी छापा टाकून १० जणांसह २ लाख ९५ हजार ४० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला असून ११ जणांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, मंगळवेढा ते सांगोला रोडवर काळा खडक येथील अजित दत्तू यांच्या शेतात मन्ना नावाचा जुगार चालत असल्याची गोपनीय माहिती मंगळवेढा पोलीसांना मिळाली. दि.२३ फेब्रुवारी रोजी रात्री १ च्या सुमारास सदर ठिकाणी पोलीसांच्या मदतीने छापा टाकला असता
नवनाथ शिवाजी दंडवते (वय.३०,शनिवार पेठ), कुमार रामेश्वर दत्तू (वय.३२,दत्तू गल्ली), हनुमंत बनसिध्द सरवदे (वय.४२, खंडोबा गल्ली), बापू किसन पवार (वय.३९,घरनिकी), सिंगु धोंडीबा वाघमोडे (वय.३३,कचरेवाडी), दिनकर तात्यासो खांडेकर (वय.२९, हिवरगाव), संदीप हरी पडवळे (वय.२९, हजारे गल्ली), अमोल कृष्णा मुद्गुल (वय.३०, शनिवार पेठ),नंदू शिवाजी रणदिवे (वय.२४,घरनिकी), संदीप दामोदर हेंबाडे (वय.२९,खंडोबा गल्ली) हे समोरासमोर बसून मन्ना नावाचा जुगार खेळत असल्याचे पोलीसांच्या निदर्शनास आले.
यावेळी पोलीसांनी रोख रक्कमसह २ लाख ९५ हजार ४० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याची फिर्याद पो.कॉ.नवनाथ डबरे यांनी दिली असून अधिक तपास पोलीस नाईक जराचंद काळेल हे करीत आहेत.
-------------

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा