मंगळवेढा येथून युवक बेपत्ता - Mangalwedha Times

Breaking

रविवार, २१ जुलै, २०१९

मंगळवेढा येथून युवक बेपत्ता



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मी दहिवडी येथील अनिल शिवदास शिंदे हा युवक रहाते घरातून अचानक बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या पत्नीने मंगळवेढा पोलिसात दिली आहे. 





अनिल शिवदास शिंदे (वय ३५ रा . म्हसोबा वस्ती ,लक्ष्मी दहिवडी ता . मंगळवेढा) हा इसम २३ जून रोजी सकाळी  ९ च्या सुमारास रहाते घरातून गावातून येतो असे सांगून निघून गेला तो परत आलाच नाही.त्याचा सर्वत्र शोध घेतला मात्र तो मिळून न आल्याने त्याची पत्नी सुरेखा हिने मंगळवेढा पोलिसात तक्रार नोंदविली.

सदर इसमाची उंची १६५ सेमी , रंग काळासावळ , अंगाने सडपातळ , नाक सरळ , चेहरा उभट , अंगात काळ्या रंगाची पॅट व पांढरा शर्ट परिधान केला असून त्याचे शिक्षण ११ वी झाले आहे . व त्याला मराठी भाषा बोलता येते . 

सदर वर्णनाचा इसम कोणास आढळल्यास त्यांनी मंगळवेढा पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा