आवताडे गटाची भूमिका आज स्पष्ट होणार ; राजकीय वाटचालीसंदर्भात लक्ष्मी दहिवडी येथे बैठक - Mangalwedha Times

Breaking

रविवार, २१ जुलै, २०१९

आवताडे गटाची भूमिका आज स्पष्ट होणार ; राजकीय वाटचालीसंदर्भात लक्ष्मी दहिवडी येथे बैठक



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

मंगळवेढा येथील श्री.संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे यांच्या व आवताडे गटाच्या आगामी राजकीय वाटचालीसंदर्भात आज सायंकाळी ५ वाजता पहिली बैठक लक्ष्मी दहिवडी येथे आयोजित केलेली आहे.



येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आवताडे गटाने ही बैठक आयोजित केलेली असून लोकसभा निवडणुकीत आवताडे गटाने भाजपला पाठिंबा जाहीर केला होता मात्र विधानसभा निवडणुकीत समाधान आवताडे हे आमदारकिच्या पदासाठी उभे राहणार आहेत.अद्यापही ते कोणत्या पक्षातून उभे राहणार की अपक्ष लढनार याबाबत पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून आज भूमिका स्पष्ट केली जाईल असे बोलले जात आहे.




आज रविवारपासून आवताडे गटाच्या बैठकीला सुरुवात होणार असून यानंतर प्रत्येक गण निहाय बैठक आयोजित केली जाणार आहे.आज सायंकाळी ५ वाजता लक्ष्मी दहिवडी येथील उपसभापती धनंजय पाटील यांच्या निवासस्थानी येथे विचारविनिमय बैठक आयोजित केली असून सर्व नागरिकांनी आणि आवताडे प्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन समाधान आवताडे यांनी केले आहे.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा