मंगळवेढ्यात पोलीस अधिकाऱ्यांचा बेकायदा शिंदी विक्री अड्यावर छापा;एकास अटक - Mangalwedha Times

Breaking

सोमवार, २२ जुलै, २०१९

मंगळवेढ्यात पोलीस अधिकाऱ्यांचा बेकायदा शिंदी विक्री अड्यावर छापा;एकास अटक




मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-


आंधळगाव ते शेलेवाडी मार्गावर बेकायदारित्या शिंदी विक्री करणा - या अड्डयावर मंगळवेढ्यातील उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रय पाटील यांनी छापा टाकून ७०० रुपये किमतीची ७० लिटर शिंदी जप्त करून ती नष्ट करण्यात आली. 

दरम्यान या प्रकरणी शिंदी विक्रेते रंगाप्पा हणमंत चिंचोळ (रा.शेलेवाडी ) याच्यावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी अटक केली आहे.



आंधळगाव ते शेलेवाडी मार्गावर त एका पत्र्याच्या शेडच्या पाठीमागे बेकायदा शिंदी विक्री होत असल्याची माहिती मंगळवेढा विभागाचे उप विभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रय पाटील यांना मिळताच त्यांनी दि . २१ रोजी ४.३० वा . एम एच १३ बी क्यु ०१५५ या सरकारी वाहनाने सदर ठिकाणी जावून छापा टाकला असता आरोपी रंगाप्पा चिंचोळ हे दोन निळया ड्रममध्ये ७० लिटर शिंदी ठेवून त्याची विक्री करीत होते . 

यावेळी पोलिसांनी या ड्रमची तपासणी केली असता त्याचा उग्रवास व रसायनमिश्रीत असल्याचे आढळून आले . तदनंतर शिंदी नष्ट करण्यात आली . याची फिर्याद पोलिस शिपाई जमीर मुजावर याने दिल्यानंतर शिंदी विक्रेता रंगाप्पा चिंचोळ याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे . 








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा