राष्ट्रवादी विधानसभा विरोधी पक्षनेते पदी आमदार भारत भालकेंची वर्णी लागण्याची शक्यता ? - Mangalwedha Times

Breaking

मंगळवार, २९ ऑक्टोबर, २०१९

राष्ट्रवादी विधानसभा विरोधी पक्षनेते पदी आमदार भारत भालकेंची वर्णी लागण्याची शक्यता ?



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे नूतन आमदार भारत भालके यांची विरोधी पक्षनेते पदी वर्णी लागण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.भालके यांच्या नावाची जोरदार चर्चा मतदारसंघात होत आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 7588214814

सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस उदयाला आल्यामुळे आता विधानसभेतल्या विरोधी पक्षनेतेपदासाठी रस्सीखेच सुरू आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे,जितेंद्र आव्हाड, भारत भालके यांची नावे आघाडीवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.मात्र त्यांच्यासह इतरही काही नावे स्पर्धेत आहेत. 


दरम्यान, राष्ट्रवादीने भाजप-शिवसेना युतीला सरकार बनविण्याचा हक्क आहे, असे सांगत आम्ही प्रबळ विरोधी पक्ष असू, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा युतीचे सरकार स्थापन होईल, हे स्पष्ट झाले आहे. मात्र, भाजपला पूर्ण बहुमत मिळालेले नाही. त्याचवेळी शिवसेनेने सत्तेत ५०-५० जागांची मागणी केली आहे. त्यावर शिवसेना अडून आहे. त्यामुळे सत्ता स्थापन होण्यास उशिर होण्याचे संकेत मिळत आहे. त्यावेळी राष्ट्रवादीत विरोधी पक्षनेते पदासाठी चुरस निर्माण झाली आहे.

सलग तीन वेळा जनतेच्या जोरावर 'हॅटट्रिक' मिळवलेले आमदार भारत भालके हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले आहेत. गेल्या दोन टर्म मध्ये त्यांनी विधानसभेत मतदारसंघाच्या प्रश्नासाठी आवाज उठवला आहे. विधानसभेत त्यांची डॅशिंग आमदार म्हणून ओळख आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसची नूतन आमदारांची बैठक  उद्या ३० ऑक्टोबरला असून या बैठकीत विरोधी पक्षनेते पद कोणाला द्यायचे याबाबत सविस्तर चर्चा होणार आहे.सलग तीन वेळा निवडून आलेले आमदार भारत भालके यांना संधी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आत्ता नवीन चेहऱ्याला संधी देण्याची तयारी दर्शवली असल्याचे बोलले जात असून यामधून आमदार भारत भालके यांच्या नावाची चर्चा सध्या तरी सुरू असून त्यांचीच वर्णी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे कोणाच्या नावाला पसंती देतात याकडे लक्ष लागले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा