मंगळवेढ्यात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या तर रासायनिक शिंदी प्याल्याने एकाचा मृत्यू - Mangalwedha Times

Breaking

बुधवार, ३० ऑक्टोबर, २०१९

मंगळवेढ्यात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या तर रासायनिक शिंदी प्याल्याने एकाचा मृत्यू



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

मंगळवेढा तालुक्यातील डोनज येथील तानाजी रामचंद्र माने (वय.३२) या युवकाने अज्ञात कारणावरून लिंबाच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मरवडे रोडवरील बोमाण्णा मळ्यात घडली आहे. 

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 7588214814

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की,मी जिवाला वैतागलो आहे .मी फास घेवुन मरणार आहे. लअसे कळविले . त्यावेळी खबर देणार यांनी त्यास ,तु फास घेवु नको तु कोठे आहे ते सांग मी तेथे येतो.असे म्हणालो परंतु त्याने मला कोठे आहे हे सांगितले नाही . 


तो तानाजी माने हा त्याचे कुटुंबासह नागणेवाडी मंगळवेढा येथे रहात असल्याने मी त्याचे घरी जावुन त्याची बायको प्राजक्ता हिला विचारले की , तानाजी कोठे आहे असे विचारले असता ती मला म्हणाली की , नवरा तानाजी याचा फोन आला आहे . तो कोठे आहे हे सांगत नाही . खबर देणार तानाजी माने यांच्या घरी असताना डोणज येथील ड्रायव्हर दत्तात्रय रामचंद्र बिराजदार हा माने यांच्या घरी आला.व तो म्हणाला की , तानाजी माने हा बोमाण्णा मळ्यात आहे . 

मी घेवुन येतो असे म्हणुन तो गेला.थोड्याच वेळात दत्तात्रय बिराजदार यांनी मला फोन करून कळविले की, तुमचा मेव्हुणा तानाजी रामचंद्र माने याने बोमाण्णा मळ्यात लिंबाच्या झाडाला गळफास घेवुन मयत झाला आहे.असे कळविल्यावर खबर देणार व त्यांचे नातेवाईक बोमाण्णा मळ्यात गेले.तेथे मेव्हुणा तानाजी माने याचे प्रेत लिंबाचे झाडाला लोंबकाळत असल्याचे दिसले . त्यास सोडून ताबडतोब संजीवनी हॉस्पिटल ,मंगळवेढा येथे उपचारासाठी आणले .डॉक्टरांनी तपासुन तो मयत झाला असल्याचे घोषित केले. 


तर दुसऱ्या घटनेत रासायनिक शिंदी प्याल्याने विष्णु गणपत जानकर (वय.२६,रा.मारापुर,ता मंगळवेढा)  दिनांक 29 / 10 / 2019 रोजी मयत हा त्याचे मोटर साईकल वरून सायंकाळी 07 / 00 वा चे सुमारास खबर देणार यांना काही एक न सांगता घरातुन भाहेर निघुन गेला विष्णु यास सिंदी पिन्याचे वेसन होते मी रात्री 08 / 00 वा चे सुमारास घरी असताना त्यांचे गावातील मसुदेव शिवाजी लोखंडे , समाधान बाळु लोखंड हे मयतास घेवुन खबर देणार यांचे घरी आले त्यावेळी मसुदेव शिवाजी लोखंडे . यांनी खबर देणार यांचा मुलगा विष्णु गणपत जानकर हा मसुदेव लोखंडे यांचे घरी बकरेचा कार्यक्रम असल्याने जेवन करून त्याचे मोटरसायकल वर बसले असता त्याचे नाका तोंडातुन लाळ येवुन थोडेशे रक्त आल्या सारखे झाले होते 

त्यामुळे त्यांनी माझा मुलगा विष्णु यास आमचे घरी आनुन सोडले विष्णुच्या नाका तोंडातुन लाळ व थुकीमध्ये थोडे रक्त आल्याचे सांगीतले आमचे गावातील अशोक साहेबराव पाटील यांनी दादा विठोबा जानकर यांना माहीती देवुन त्यांचे स्कॉरपीओ गाडी बोलावुन त्यास ग्रामीण रूग्णलय मंगळवेढा येथे उपचारासाठी संजिवणी हॉस्पीटल मंगळवेढा येथे आणले . 

तेथील डॉक्टरांनी मुलगा विष्णु यास ग्रामीण रूग्णालय मंगळवेढा येथे घेवुन जान्यास सांगील्याने आम्ही तेथे घेवुन गेला असता तेथिल डॉक्टरांनी त्यास तपासुन तो मयत झाला असल्याचे सांगीतले ती वेळ 21 / 15 वा . ची होती त्या नंतर आम्ही मंगळवेढा पोलीस ठाणेस मयताची खबर दिली.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा