राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ नेतेपदी अजित पवारांची निवड - Mangalwedha Times

Breaking

बुधवार, ३० ऑक्टोबर, २०१९

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ नेतेपदी अजित पवारांची निवड



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ नेतेपदी अजित पवार यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी अजित पवारांच्या नावाचा प्रस्ताव मांडला.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 7588214814

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ गटनेतेपदी अजित पवार यांची निवड करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईत पक्षाच्या कार्यालयात आयोजित बैठकीत अजित पवारांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्याला राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, अनिल देशमुख यांनी अनुमोदन दिले.







दरम्यान आज दुपारी भाजपनं विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड केली.

विधिमंडळ नेतेपदासाठी चंद्रकांत पाटलांनी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचा प्रस्ताव मांडला . या प्रस्तावाला सुधीर मुनगंटीवारांनी अनुमोदन दिलं.

मुनगंटीवारांसह संजय कुटे, हरीभाऊ बागडे, राधाकृष्ण विखे-पाटील, शिवेंद्रराजे भोसले, आशिष शेलार, गणेश नाईक, सुरेश खाडे, देवयानी फरांदे, गणेश नाईक, मंगलप्रभात लोढा यांनीही या प्रस्तावाला अनुमोदन केलं.

विधिमंडळ नेतेपदी निवड केल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांचे आभार मानले.

'माझ्यासारख्या लहानशा कार्यकर्त्याला 2 वेळा जबाबदारी दिल्याबद्दल नरेंद्र मोदींचे विशेष आभार मानतो,' असं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना म्हटलं. त्यांच्याबरोबरच फडणवीस यांनी जे.पी.नड्डा आणि अमित शहांचेसुद्धा आभार मानले.


शिवसेनेच्या साथीमुळेच महायुतीला प्रचंड मोठं यश प्राप्त झाल्याचं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंचेही आभार मानले.


"100 पेक्षा जास्त जागा मिळल्यानं हा मोठा विजय आहे. महायुतीला लोकांनी जनादेश दिला आहे. सरकार महायुतीचं येईल, अफवांवर विश्वास ठेवू नका. चर्चा झाल्याशिवाय मजा येत नाही. लवकरच सरकार स्थापन होईल," असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा