मंगळवेढा तालुक्यातील खवे येथील नाथपंथी डवरी गोसावी समाजातील पाच भिक्षा मागण्यासाठी धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे गेल्यावर, सोशलमिडीयातील अफवेमुळे मुले पळवणारी टोळी समजून नाथपंथी डवरी गोसावी समाजातील पाच जणांची निर्घुण हत्या करण्यात आली होती.त्यांच्या नातेवाईकांना पोलिस अधिक्षक डॉ.मनोज पाटील यांनी दिवाळी साहित्य देऊन कुटूंबासमवेत यंदाच्या दिवाळीतील काही क्षण सोबत घालवले.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 7588214814
त्यामधील खवे येथील कै.भारत माळवे, कै. दादाराव भोसले, कै.भारत भोसले,अग्नू इंगोले यांच्या नातेवाईकांची जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. मनोज पाटील आपल्या आईसमवेत भेट घेत त्यांना दिवाळीनिमित्त फराळाचे साहित्य दिले.
यावेळी पोलीस निरीक्षक अनिल गाडे, भटक्या जाती व विमुक्त संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मच्छिंद्र भोसले, कार्याध्यक्ष गजेंद्र भोसले,दिगंबर माळवे, प्रकाश इंगवले, दादाराव भोसले, अशोक चौगुले, भैरू भोसले, शांताबाई माळवे, नर्मदा भोसले, आदीसह या समाजातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी मनोज पाटील म्हणाले, की सोशल मीडियातील अफवेमुळे येथील कुटुंबकर्त्याचा नाहक बळी गेला असला तरी भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी समाजातील सर्वच घटकांनी जागृत राहणे आवश्यक आहे. केवळ भिक्षेवर आपले जीवन व्यथीत करणाऱ्या नाथपंथी डवरी गोसावी समाजाला महाराष्ट्रामध्ये भिक्षा मागण्यासाठी फिरताना त्यांना पोलीस खात्याकडून ओळखपत्र देण्याच्या संदर्भात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा