मंगळवेढा-बोराळे रस्त्यावर रस्त्यालगतचे झाड पडल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. या रस्त्यावरील बोराळे गावापासून ३ किमी अंतरावर हे झाड रात्री अचानक कोसळले . यामुळे मंगळवेढाकडून बोराळे,सिद्धापूर, अरलीकडे जाणारी आणि बोराळेकडून मंगळवेढाकडे येणारी वाहतूक ठप्प झाली आहे.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 7588214814
बांधकाम विभागाचे दुर्लक्षामुळे रस्त्यावरून प्रवाशांना नाहक त्रास सोसावा लागत आहे. परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे.
मंगळवेढा-बोराळे रस्त्यावर झाड पडल्याने वाहतूक गेल्या अनेक तासांपासून खंडित झाली आहे,त्यामुळे प्रवाशांचे खूप हाल होत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा