मंगळवेढा शहर आणि परिसरात पहाटे दाट धुक्याची चादर पसरली होती.धुक्यामुळे पहाटे फिरायला जाणाऱ्यासह वाहनधारकांना धुक्यातून वाट काढताना कसरत करावी लागली.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 7588214814
निसर्गाची वेगवेगळी रुपे एकाच दिवसात दिसू लागली आहेत. मंगळवेढा शहरात शनिवारी पहाटेपासून ८ वाजेपर्यंत धुक्यांची चादर पसरली होती. दाट धुक्यांमुळे फिरायला जाणाऱ्या नागरिकांसह, शाळकरी मुले, व्यावसायिकांना धुक्यांमधून वाट शोधत जावे लागले.
दाट धुके असल्यामुळे वाहनांना सावकाश जावे लागत होते. आठ वाजल्यानंतर सूर्यदर्शन झाले. सकाळ दाट धुके आणि दुपारी कडक ऊन असा अनुभव नागरिकांनी घेतला.
निरीक्षणानुसार आगामी चार दिवस तापमानात चढ-उतार अनुभवास येतील. हवामानाचा हा लहरीपणा आता आणखी काही दिवस नागरिकांना सोसावा लागणार आहे. या लहरीपणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. खोकला, सर्दी, तापाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा