मंगळवेढा-डोंगरगांव मार्गावर दोन मोटर सायकलची समोरासमोर धडक झाल्याने अंकुश विठ्ठल मेटकरी (वय.३० रा.डोंगरगांव) हा गंभीर जखमी होवून जागेवर मयत झाला तर अविनाश अंकुश लटके (वय ३४) हा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:7588214814
या घटनेची हकिकत अशी की,यातील मयत अंकुश मेटकरी व जखमी अविनाश लटके हे एम.एच.१३.बी.ए.३५९६ व एम.एच १३ बी.सी. ७०४० वरून जात असताना दोन मोटर सायकलची धडक झाल्याने अंकुश मेटकरी हे गंभीर जखमी झाल्याने खबर देणारे अंकुश जाधव यांनी डमडममधून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी उपचारापुर्वीच मयत झाल्याचे सांगितले.
ही घटना दि. ३१ रोजी ४.३०वा. मंगळवेढा डोंगरगाव मार्गावरील मुढे वस्तीजवळ घडली . या अपघाताचा अधिक तपास पोलिस हवालदार काळेल करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा