वैमनस्यातून मंगळवेढ्यात एकावर ब्लेडने गंभीर वार - Mangalwedha Times

Breaking

रविवार, ३ नोव्हेंबर, २०१९

वैमनस्यातून मंगळवेढ्यात एकावर ब्लेडने गंभीर वार

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

चोरीच्या गुन्ह्यात पकडून दिल्याचा मनात राग धरून दगडाने कपाळावर , डोक्यावर मारून पोटावर , पाठीवर ब्लेडने वार करून एकास गंभीर जखमी केल्याप्रकरणी किरण गायकवाड , गणेश जाधव (रा.सेंटलमेंट सोलापूर ) या दोघा विरूद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. 

२७ ऑक्टोबर रोजी रात्री ९ च्या दरम्यान हुलजंती यात्रेत चोरीसाठी आरोपी किरण गायकवाड , गणेश जाधव यांना फिर्यादी राजेंद्र नितळे ( रा . बोरगांव काळे जि . लातूर ) यांनी सन २०१४ साली लातूर येथील गांधी चौक पोलिस ठाणेच्या हद्दीतील चोरीच्या गुन्ह्यात वरील दोघांना पकडून दिल्याचा राग मनात होता . 

फिर्यादीस गंभीर जखमी केले . महालिंगराया मंदिराच्या समोरील असलेल्या विजापूर - पंढरपूर जाणाऱ्या रोड लगतच्या चारीत टाकून दिले असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा