मंगळवेढ्यात एकाच रात्रीत चार घरफोड्या;पोलिसांनी गस्त वाढवावी - Mangalwedha Times

Breaking

रविवार, २७ ऑक्टोबर, २०१९

मंगळवेढ्यात एकाच रात्रीत चार घरफोड्या;पोलिसांनी गस्त वाढवावी



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

मंगळवेढा तालुक्यातील फटेवाडी येथील चार घरात अज्ञात चोरटयानी प्रवेश करून दोन घरातील सुमारे १७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला तर इतर दोन घराचे कुलूप तोडले मात्र तेथे चोरीचा प्रयत्न अपयशी घडल्याची घटना २६ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री व पहाटेच्या सुमारास घडली आहे. 

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:7588214814

याबाबत अधिक माहिती अशी की ,फटेवाडी येथील एकनाथ फटे यांच्या जून्या परसाच्या रुममध्ये अज्ञात चोरटयानी प्रवेश करून कपडयांच्या खिशात असणारे ११ हजार रुपयांची रोकड तर त्यांचे शेजारी रहाणारे रणजित पंडित वाडदेकर यांचेही घरात रात्रीचे वेळी घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरटयांनी प्रवेश करून त्यांची पत्नी भाग्यश्री वाडदेकर यांचा मोबाईल चोरून नेला. 






तसेच चोरटयांनी आपला मोर्चा तेथीलच संतोष फटे व अंकुश फटे यांच्या घराकडे वळविला मात्र तेथे त्यांना काहीच मिळाले नाही. म्हणून त्यांनी घरातील सामान अस्ताव्यस्त पसरवून टाकले. याची फिर्याद सुदर्शन फटे यांनी मंगळवेढा पोलिसात दिल्याने पोलिसांनी अज्ञात चोरटयांविरूध्द भा . दं . वि . स . कलम ३५७ , ३८० , ५११ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून तपास पोलिस निरिक्षक अनिल गाडे हे करीत आहेत.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा