मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येथील संतोष देवप्पा पेटरगे (वय.१९) हा तरुण रत्नागिरी येथे आर्मी भरतीसाठी गेला असता गणपतीपुळे येथून बेपत्ता झाला आहे.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:7588214814
याबाबत सविस्तर माहिती अशी की,सोलापूर येथे एका महाविद्यालयामध्ये अभियांत्रिकी शिक्षण घेत असलेला संतोष दि.१७ नोव्हेंबर रोजी आर्मी भरतीसाठी रत्नागिरी येथे गेला होता. भरती प्रक्रिया आटपून तो एका मित्राबरोबर फिरण्यासाठी गणपतीपुळे येथे गेला आणि तेथूनच तो बेपत्ता झाला असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले.
तो बेपत्ता होऊन आज पाच दिवस झाले तरी त्याच्याशी संपर्क होऊ शकला नसल्यामुळे कुटुंबातील सदस्य व नातेवाईक त्याचा शोध घेत आहेत. सदरचा तरुण कोणाला दिसल्यास काही माहिती मिळाल्यास 9594677633,9666618154, 7391849573 या नंबर वरती संपर्क करण्याचे आवाहन त्याचा नातेवाइकांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा