मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा उद्याचा होणारा मंगळवेढा दौरा रद्द झाला आहे.मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके दुपारी तीन वाजता येथील आठवडा बाजार मैदानात नागरी सत्कार होणार होता.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:7588214814
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार , त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या हस्ते हा सत्कार होणार होता मात्र सध्या महाराष्ट्र राज्य मध्ये नवे महाविकासआघाडी चे सरकार स्थापन होण्याच्या हालचाली सुरू आहेत, या मध्ये शरद पवार यांची महत्वाची भूमिका असल्याने पुढील दोन दिवसाचे सर्व कार्यक्रम शरद पवार यांनी तूर्तास स्थगित केले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस , काँग्रेस , स्वाभिमानी शेतकरी संघटना , शेतकरी कामगार पक्ष , मनसे , समाजवादी पक्ष , रिपाइं गवई व कवाडे गट , प्रहार संघटनेने हा सोहळा आयोजित केलेला होता.
याप्रसंगी महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर ,जिल्हाध्यक्ष बळीराम साठे ,माजी आमदार राजन पाटील ,आमदार यशवंत माने , तासगावचे रोहित पाटील ,उमेश पाटील ,संतोष पवार ,भारत जाधव ,राजूबापू पाटील यांची प्रमुख उपस्थितीत राहणार होते.
सरकार स्थापन झाल्यानंतर पुढील तारीख व वेळ कळविण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा