वाढता तोटा आणि कंपन्यांतर्गत निर्माण झालेली तीव्र स्पर्धा यामुळे उत्पन्नास फटका बसत असल्याने देशातील प्रमुख दूरसंचार कंपन्यांनी ५० टक्के शुल्कवाढ करण्याचा निर्णय घेतलाय. व्होडाफोन-आयडिया, भारती एअरटेल आणि जिओने डिसेंबरपासून दरवाढ करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार या कंपन्यांनी रविवारी सुधारित दर जारी केलेत.
बातम्या व जाहितरीसाठी संपर्क:7588214814
यानुसार व्होडाफोन-आयडिया आणि भारती एअरटेलनं ३ डिसेंबरपासून मोबाईल सेवेच्या प्रीपेड शुल्कात ५० टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचे जाहीर केलंय. त्यापाठोपाठ सर्वात स्वस्त दूरसंचार सेवा सेवा पुरवणाऱ्या रिलायन्स जिओनेही ६ डिसेंबरपासून ४० टक्के दरवाढीची घोषणा केलीय. त्यामुळे मोबाईल वापरकर्त्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे.
दरम्यान दुरसंचार क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्या असणाऱ्या व्होडाफोन- आयडिया आणि 'भारती एअरटेल'ने मंगळवार, ३ डिसेंबरपासून मोबाइल सेवेच्या प्रिपेड शुल्कात सुमारे ५० टक्क्यांपर्यंतवाढ करण्याचे जाहीर केले.
त्यापाठोपाठ सर्वात स्वस्त दूरसंचार सेवा पुरवणाऱ्या 'रिलायन्स जियो'नेही ६ डिसेंबरपासून सुमारे ४० टक्के दरवाढीची घोषणा केली आहे.
रिलायन्स जिओच्या स्पर्धेत आतापर्यंत तुलनेने कमी दर ठेवून तग धरलेल्या व्होडाफोन-आयडिया आणि भारती एअरटेल कंपन्यांनी जाहीर केलेल्या प्रिपेड दरवाढीमुळे संभाषण आणि मोबाइल इंटरनेट वापराचे दर जवळजवळ दुप्पट होणार आहेत. तसेच मोबाइल जोडणी महिनाभर अतूट राहावी यासाठी दोन्ही कंपन्यांच्या ग्राहकांना किमान ४९ रुपयांचा 'रिचार्ज' करणे आवश्यक आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा