मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
महाराष्ट्रात सध्या महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले असून शिवसेनेच्या शैला गोडसे यांनी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील जनतेच्या विविध प्रशांसाठी गेल्या काही वर्षांपासून पायाला भिंगरी बांधून ग्रामपंचायत पातळीपासून ते थेट मंत्रालयापर्यंत पाठपुरावा करून विविध प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा शैलाताई गोडसे यांना शिवसेनेच्या हक्काच्या पंढरपूर-मंगळवेढा विधासभा मतदार संघातून उमेदवारी मिळणार हे निश्चित मानले जात होते. स्वतःशैला गोडसे यांनीही विधानसभा निवडणूक लढवायच्या दृष्टीकोनातुन जोरदार तयारी केली होती.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:7588214814
जिल्हा संपर्क प्रमुख तानाजी सावंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवीत शैला गोडसे या आपली उमेदवारी निश्चित मानत कामालाही लागल्या होत्या. पण ऐनवेळी भाजपचा मित्रपक्ष असलेल्या व पंढरपूर- मंगळवेढा तालुक्यात रयत क्रांतीला हि जागा सोडली आणि खऱ्या अर्थाने पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील शिवसेनेच्या अनेक कट्टर कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास झाला होता. तर शैला गोडसे यांच्या रूपाने या मतदार संघातून प्रथमच एक महिला निवडणुकीत उतरणार असल्याने उत्साहात असलेल्या महिला मतदारांचाही मोठा अपेक्षाभंग झाला होता.
मात्र हा सारा धक्का सहन करीत शैला गोडसे या अतिशय संयमाने युतीधर्माचे पालन केले. शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. आ. तानाजी सावंत हे शैला गोडसे यांना बळ देतील अशी अपेक्षा या जिल्ह्यातील काही कट्टर शिवसैनिक व्यक्त करीत असून राज्यात शिवसेनेचे सरकार सत्तारूढ झाले आहे.
आपल्या ”प्रथम ती” या अभियानाचा मान राखत शिवसेना शैला गोडसे यांना नक्कीच योग्य ती जबादारी सोपविला असा विश्वास जिल्ह्यातील कट्टर शिवसैनिक व शिवसेनेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी संघर्ष करणाऱ्या शिवसेनेच्या महिला आघाडीच्या विविध पदाधिकारी व कार्यकर्यांकडून व पंढरपूर- मंगळवेढा तालुक्यातील महिला मतदारांकडून व्यक्त केला जात आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा