मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला उच्चांकी १३ हजार ३३१ रुपये दर - Mangalwedha Times

Breaking

बुधवार, ४ डिसेंबर, २०१९

मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला उच्चांकी १३ हजार ३३१ रुपये दर



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज झालेल्या कांद्याच्या लिलाव प्रक्रियेमध्ये यंदाच्या हंगामात मंगळवेढा मधील बबलू गायकवाड या शेतकऱ्यांने उत्पादित कांद्याला प्रति क्विंटल 13 हजार 331 रुपये असा उच्चांकी दर मिळाला आहे.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:7588214814


मंगळवेढा बाजार समितीमध्ये बबलू गायकवाड या शेतकऱ्याच्या कांद्याला मारुती हरी काळे या व्यापार्‍याने वसंत रामचंद्र चेळेकर आडत फर्मचे मालक रविकिरण चेळेकर यांच्या दुकानातील लिलाव प्रक्रियेत बोली लावत 13 हजार 331 रुपयात उच्चांकी दर जाहीर केला एवढा मोठा उच्चांकी दर जाहीर केल्यानंतर उपस्थिती व्यापाऱ्यांनी व शेतकऱ्यांनी जल्लोष केला. 

त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सोमनाथ अवताडे यांनी या उच्चांकी दर मिळाल्याने बबलू गायकवाड या शेतकऱ्यांचा बाजार समितीच्या आवारात सत्कार केला.

यावेळी जिल्हा बँकेचे संचालक बबनराव आवताडे, तज्ञ संचालक सत्यजीत सुरवसे मुंबईतील कांदा व्यापारी सुरेश मल्लाळे,कोल्हापूरचे गणेश थोरबोले,सचिव सचिन देशमुख, मोहन माळी प्रमोद भगरे, नवनाथ बनसोडे, सचिन चेळेकर, नगरसेवक अनिल बोदाडे, ओंकार भोसले,मारुती काळे, , धनाजी पवार, दत्तात्रय कांबळे, परमेश्वर इंगळे, अरुण माने,दत्ता शिंदे, विनायक आवताडे, दत्तात्रय टुले,आदी उपस्थित होते.

दुष्काळी तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांनी पारंपरिक पीक पद्धतीमध्ये बदल करत कमी खर्चात जास्त उत्पादन मिळणारे पीक घेताना उत्पादित पिकांना नजीकची बाजारपेठ मंगळवेढ्याच्या बाजार समितीकडे ओढा वाढला. या बाजार समितीने यापूर्वी वांग्याला उच्चांकी दर दिलेला आहे व कांद्यालाही पाठीमागील वर्षामध्ये राज्यातील सर्वात उच्चांकी दर मिळालेला होता या बाजार समितीमध्ये मंगळवेढा तालुका शिवाय सांगोला, पंढरपूर मोहोळ, कर्नाटकातील काही गावातील शेतकऱ्यांचा कांदा विक्रीसाठी येत आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा