सोलापूर जिल्हा परिषद मोहिते-पाटील गटाच्या 'त्या' सदस्यांना दिलासा - Mangalwedha Times

Breaking

मंगळवार, १४ जानेवारी, २०२०

सोलापूर जिल्हा परिषद मोहिते-पाटील गटाच्या 'त्या' सदस्यांना दिलासा

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-


जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणूकीत पक्षाध्यक्ष डावलल्याप्रकरणी मोहिते-पाटील गटाच्या सहा सदस्यांचे सदस्यत्व रद्द करावे अशी राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या तक्रार अर्जावर सोमवारी सुनावनी अपूर्ण राहिल्याने त्या सदस्यांना तुर्त दिलासा मिळाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी मोहिते-पाटील गटाच्या व राष्ट्रवादी काँग्रेस चिन्हावर माळशिरस तालुक्यातून निवडून आलेल्या शितलदेवी मोहिते-पाटील, स्वरूपाराणी मोहिते-पाटील, सुनंदा फुले, अरूण तोडकर व अन्य एका सदस्यांविरूध्द जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे़ या तक्रारीवर सोमवारी सुनावनी झाली़ मोहिते-पाटील गटाच्या वकीलांनी पुरावे देण्यासाठी मुदत मागणीचा केलेला अर्ज व त्यावर मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल करण्यासंदर्भात केलेला अर्ज जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा