मंगळवेढ्यात अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी दोघाविरूध्द गुन्हा दाखल - Mangalwedha Times

Breaking

बुधवार, १५ जानेवारी, २०२०

मंगळवेढ्यात अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी दोघाविरूध्द गुन्हा दाखल


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

माणसाच्या मनात विकृती आली तर ती त्याला कोणच्या थराला नेईल याचा नेम नाही. मंगळवेढा मध्ये अशीच एक घृणास्पद घटना घडली आहे.

जाहिरातीसाठी संपर्क:7588214814

ऊसाच्या फडात नेवून मारहाण करून एका मुलावर अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी समाधान भिमराव मेटकरी व त्याचा मित्र यश बाबर (पूर्ण नाव माहिती नाही) या दोघांवर बाल लैंगिक अत्याचार कलमान्वये मंगळवेढा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. 


याबाबत अधिक माहिती अशी ,यातील पिडीत मुलगा हा केस कापण्याकरीता जात असताना आरोपीने सदर पिडीत मुलास मोटर सायकलवर बसवून मंगळवेढा शहरानजीक असलेल्या भंगार दुकानाकडे घेवून गेले. 

तेथून सुत गिरणीजवळ असलेल्या ऊसाच्या शेतात नेवून पिडीत मुलास मारहाण करून अंगावरील कपडे काढून दोघा आरोपींनी अनैसर्गिक कृत्य केले व त्याचे मोबाईमध्ये रेकॉर्डीग करून सदरची माहिती कोणास सांगितल्यास व्हिडिओ व्हॅटसअॅपवर टाकीन व तुम्हाला जीवंत सोडणार नाही असे धमकी दिल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. 

अधिक तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक बामणे करीत आहेत.









कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा