टीम मंगळवेढा टाईम्स । दारूच्या नशेत दुचाकीवरून जाताना जोरात आरडाओरड करत दोघांनी वाहतूक पोलिसांना दमदाटी केली. रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास मंगळवेढा येथील सांगोला रस्त्यावर अवताडे पेट्रोल पंपासमोर ही घटना घडली.
याप्रकरणी त्या दोघांवर येथील पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. समाधान विठ्ठल काळुगे (वय ३५) रविकिरण तानाजी काळुगे (वय ३२ , दोघे रा.कचरेवाडी, ता.मंगळवेढा अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.
रविवारी सकाळी मंगळवेढा-सांगोला रस्त्यावर वाहतूक पोलिस कारवाई करीत होते.तेव्हा संशयित समाधान काळुगे व रविकिरण काळुगे हे दोघे एम.एच.१३.वाय.१९४७ क्रमांकाच्या मोटारसायकलवरून दारूच्या नशेत जाताना अवताडे पेट्रोल पंपासमोर आढळले.
दुचाकी अतिवेगात होती.पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला. मात्र न थांबता पाठीमागे बसलेल्या रविकिरण काढुंगे याने जोरात आरडाओरड करीत तुम्हाला बघून घेतो, अशी धमकी दिली.
पोलिस नाईक सर्जेराव वाघमोडे यांनी फिर्याद दिली . त्यावरुन गुन्हा दाखल केला. पोलिस नाईक बंडोपंत कुंभार तपास करीत आहेत.
बार्शीत दोन दिवसांत दोघांची आत्महत्या
बार्शी शहरातील तुळजापूर रोडवर राहणाऱ्या भगवान विठ्ठल पवार ( वय ५४ ) यांनी राहत्या घरी दुसऱ्या मजल्यावरील खोलीमध्ये रविवारी पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केली.
बार्शी शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी , एक मुलगा , एक मुलगी , सून , नातवंडे असा परिवार आहे . तावडी विविध सेवा सहकारी सोसायटीचे ते सेक्रेटरी होत.
रविवारी सकाळी नऊ वाजता ही घटना उघडकीस आली. गळफास काढून ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
पण उपचारापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला . तपास हवालदार गणेश वाघमोडे करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत नाईकवाडी प्लॉट , शंभरफूट रोड येथे राहणाऱ्या राहूल राजाराम वाघ ( वय २२ ) या युवकाने घरातील दुसऱ्या मजल्यावर शनिवारी सायंकाळी पाच वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली.
शहर अन् तालुक्यात दररोज विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न तसेच गळफास घेऊन आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
अवैध वाळू चोरीप्रकरणी वाटंबरेत कारवाई
अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या जीपचा पाठलाग करुन दोन जणांना ताब्यात घेवून जीपसह दोन लाख चार हजार रुपयेचा मुद्देमाल जप्त केल्याची घटना शनिवार रोजी रात्रीच्या सुमारास वाटंबरे (ता.सांगोल ) येथे घडली आहे.
पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांच्या आदेशाने विकास शिरसागर , नागेश निंबाळकर आदीजण शनिवारी रोजी रात्रीच्या सुमारास पेट्रोलिंग करीत असताना वाटंबरे (ता.सांगोला) येथील हॉटेल पांडेजी समोर (एमएच ४५ / टी ३८४८) पांढऱ्या रंगाची बोलेरो पिकअप संशयितरित्या वेगाने जात असताना दिसली.
पोलिसांनी पिकअप जीपचा पाठलाग करुन जीप थांबवली असता बोलेरो जीपमध्ये वाळू आढळून आली. पोलिसांनी दोन लाख रुपयेची जीप व वाळू असा दोन लाख चार हजार रुपयेचा मुद्देमाल जप्त करून अवैध वाळू चोरीप्रकरणी सिद्धनाथ बाजीराव पवार (वय २५ , पवारवाडी , वाटंबरे , ता. सांगोला) व दिनेश तुकाराम साळुखे (रा.जवळा , ता . सांगोला ) या दोघांना ताब्यात घेऊन दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा