टीम मंगळवेढा टाईम्स । विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अखेर भारतनाना भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांचीच बिनविरोध निवड झाली असून भारतनानांच्या निधनानंतर सोलापूर जिल्ह्याचे लक्ष या निवडीकडे लागले होते. ही निवड बिनविरोध झाल्याने तालुक्याच्या राजकारणात सकारात्मकता आली आहे.
विठ्ठल कारखान्याचे चेअरमन आमदार भारतनाना भालके यांचे निधन झाल्यामुळे चेअरमन पद रिक्त होते, या पदाची निवड आज करण्यात आली.
पंढरपूर तालुक्याचे तर या निवडीकडे बारीक लक्ष होते. ही निवड एका चेअरमन पदापुरती मर्यादित नसून या निवडीचा तालुक्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम दिसणार आहे त्यामुळे या निवडीला विशेष महत्व प्राप्त झाले होते.
निवडणुकीत काहीही होईल असा प्रत्येकाचा अंदाज व्यक्त होत असताना भागीरथ भालके यांची बिनविरोध निवड झाली असून शेतकरी सभासदांतून या निवडीचे जोरदार स्वागत करण्यात आले आहे. ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे विठ्ठल परिवाराची राजकीय शक्ती अबाधित राहिली आहे.
पद आणि सत्ता यासाठी विठ्ठल परिवाराची शक्ती दुभंगणे विरोधकांच्या पथ्यावर पडले असते पण समजुतीच्या राजकारणामुळे आणि युवराज पाटील यांनी मनाचा मोठेपणा दाखविल्याने विठ्ठल परिवाराच्या शक्तीला आणखी बळ मिळाले आहे. सहाय्यक निबंधक एस एम तांदळे यांनी ही निवड झाल्याची घोषणा केली.
सर्व संचालकांनी भगीरथ भालके यांच्या नावाला संमती देत निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे तसे कळवले होते त्यानुसार ही निवड झाली. या निवडीचे जोरदार स्वागत करण्यात आले असून तालुक्यातून भालके यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा